मृत मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यासाठी नागरिकांना आवाहन

Foto
निवडणूक २०२६ : मतदार यादी शुद्धीकरणासाठी प्रशासनाची विशेष मोहीम

सिल्लोड, (प्रतिनिधी): निवडणूक २०२६ अंतर्गत मतदार यादीचे विशेष पुनरिक्षण व अद्ययावतीकरण सुरू असून, मतदार यादी अधिक शुद्ध, अचूक व अद्ययावत करण्यासाठी मृत मतदारांची नावे वगळण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

नागरिकांनी आपल्या कुटुंबातील किंवा नातेवाईकांपैकी निधन झालेल्या व्यक्तीचे नाव अद्याप मतदार यादीत असल्यास, संबंधित बूथ लेव्हल अधिकारी यांना माहिती देऊन ते नाव नियमानुसार कमी करून घ्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले आहे.

नगरपरिषद प्रशासन, सर्व बूथ लेव्हल अधिकारी तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मतदार यादीची पडताळणी करून मृत मतदारांची नावे आढळल्यास त्याची माहिती तत्काळ निवडणूक विभागाला उपलब्ध करून द्यावी, असेही प्रशासनाने शुद्ध, अचूक व अद्ययावत मतदार यादी हीच पारदर्शक व निष्पक्ष निवडणुकीची गरज असल्याचे नमूद करत सर्व नागरिक, नगरपरिषद प्रशासन, आणि यांनी या विशेष शुद्धीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

याशिवाय सर्व यांनी आपल्या मतदान केंद्राच्या मतदार यादीतील मृत मतदारांची माहिती संबंधित यांच्या निदर्शनास आणून द्यावी. त्यानंतर आवश्यक पडताळणी करून मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे :
▶ निवडणूक-२०२६ अंतर्गत मतदार यादीचे विशेष पुनरिक्षण सुरू.
▶ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यावर भर.
▶ नागरिकांनी निधन झालेल्या मतदारांची माहिती संबंधित यांना द्यावी. व यांच्या समन्वयातून मतदार यादी शुद्धीकरणाची मोहीम.
▶ पारदर्शक व निष्पक्ष निवडणुकीसाठी प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन.